नविन वर्ष सुरु होताना इतकं छान वाटतंय म्हणून सांगु! उद्या "ती" येणार आहे. किती दिवस झाले खरंच. खरंतर २-४ वर्षच झाले आहेत पण असं वाटतंय की युगे लोटलीत भेट होऊन. कसं आणि काय करावं; काही म्हणून सुचत नाहीये. पाडवा आहे म्हणुन पुरण तर घालणार आहेच मी पण अजून काय विशेष करावं बरं? तसं आधी गुलाबजामूनच करायचा बेत होता. पण "ती" येणार आहे असं कळाल्यावर बिनधास्त पुरणाचा घाट घालणार आहे मी.
इथे आल्यापासून नुसती वाटच पाहणे चालू आहे "तिची". "ती" कधी इथे येईल असं वाटलंच नव्हतं; पण अगदी उद्या येतीये म्हणजे दुधात साखरच जणु! माझ्या आनंदाला तर पारावारच नाही उरला. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि "ती" येतेय असं झालंय. वेळ अगदी मुंगीच्या पावलाने पुढे सरकतोय असं वाटतं आहे. मनाला एक प्रकारची शांती मिळतेय "ती" येणार म्हटलं की. नाचावसं वाटतंय, पंख लावून उडावसं वाटतंय. अहाहा "ती" येतीये!
इतकं भारी वाटत आहे ना! मैत्रिणीला भारतात फोन करून ही आनंदाची बातमी सांगिलीच मी. तिला वाटलं मला हर्षवायुच झालाय. पण शेवटी तिलाही माझ्या भावना कळल्याच कारण तीही कधी ना कधी तरी अशा परिस्थितीतून गेलीये ना. आम्ही खूप गप्पा मारल्या मग तिच्याविषयी. हा तर नेहमीचा जिव्हाळ्याचा विषयच आहे म्हणा!
माझा एकंदर नुर पाहुन नवऱ्याला काळजी वाटतेय. पण त्याला काय कळणार; मला किती निवांत वाटतं आहे ते. तो सारखा म्हणतोय "तु बरी आहेस ना गं?" मी सांगितलं त्याला "अरे "ती" येतीये ना त्यामुळे मला कीनई फार भारी वाटतंय रे." तर म्हणे " माझी पण इतकी वाट पाहत नाहीस कधी!" आता त्याला काय सांगणार फरक. असो. माझ्या मनात उकळ्या फुटत आहेत हे कसं समजवणार त्याला. कोणी काहीही म्हणो पण ती आली की फेसबुकवर पोस्टच टाकणार आहे मी "फिलिंग व्हेरी हॅप्पी किंवा फिलिंग रिलॅक्सड किंवा फिलिंग फेस्टिव्ह विथ ती. "
एकदाचा पाडव्याचा दिवस उजाडला. सगळं पटकन आवरून, पुरणावरणाचा स्वयंपाक करुन, मस्तपैकी जेवण उरकुन मी आपली तिची वाट पाहत बसले आणि कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. आनंदाच्या भरात झोपेतही अचानक कुठून तरी मंद संगीताचे सूर ऐकू यायला लागले. पण हळुहळू आवाज खूपच वाढायला लागला, मला वाटलं दारावरची बेल वाजली. तीच आली असेल. धडपडत उठले, वाटलं पटकन दार उघडु आणि पाहते तर.....
आजूबाजूला सगळी शांतता होती आणि माझ्या फोनमधला अलार्म वाजत होता.
.
.
.
.
हाय रे कर्मा! म्हणजे ती स्वप्नात सुद्धा माझ्या इथल्या घरी आलीच नाही? म्हणजे सगळे पुरणाच्या स्वयंपाकाचे भांडे मलाच घासावे लागणार??
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक