तुम्ही प्रचंड उद्विग्न अवस्थेत असता, वेगवेगळे विचार डोक्यात अक्षरशः थैमान घालत असतात आणि लेक पटकन जवळ येऊन म्हणतो " आई मी तुला एक खूप भारी गाणं सांगतो, तु ऐक, बघ तुला एकदम Happy वाटेल". खरंतर कोणतेही गाणं वगैरे ऐकण्याच्या मनःस्थितीत तुम्ही अजिबात नसता, पण लेकाचे आर्जवं पण डावलायची इच्छा होत नाही. म्हणून मग विमनस्क अवस्थेत तुम्ही youtube ला Pharrell Williams चे - Happy song लावता. आणि काय आश्चर्य गाणं ऐकता ऐकता तुम्हाला खरंच आनंदी वाटायला लागतं. मस्त नाचावं वगैरे वाटायला लागतं. त्यानंतर लेकानी सुचवलेले वेगवेगळे गाणे ऐकुन खूप छान वाटतं. सगळं उद्विग्नतेचं मळभ दूर निघून जातं!! संगीतात जादू असते म्हणतात ते काही खोटे नाही. भाषा जरी समजत नसली तरी भावना संगीतातूनच पोहोचतात. कारण इंग्लिश किंवा जर्मन गाण्यातले सगळेच शब्द पटकन समजत नाहीत तरीही हि गाणी ऐकावीशी वाटतात. आपल्याकडे तर प्रचंड खजिना आहे गाण्यांचा. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींशी रिलेट होणारे असंख्य गाणे आहेत.
गाण्याविषयी लिहितेय म्हणुन एक मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आठवली. मी लहान म्हणजे साधारण ४-५ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी रेडिओ कम टेपरेकॉर्डर घेतला होता. माझ्या वडिलांना मोहम्मद रफी प्रचंड आवडतात. त्यावेळी ते जास्त रफीचेच गाणे ऐकायचे. रफीचे सगळे फेमस गाणे त्यावेळी माझ्या कानावरून वारंवार जात होते. तेव्हा किशोर कुमार अजून फेमस व्हायचे होते. मोठं झाल्यावर जेव्हा जेव्हा रफी
ची गाणी ऐकली तेव्हा जाणवलं कि मला प्रत्येक गाण्याचा शब्द न शब्द पाठ आहे. तसा अजूनही बऱ्यापैकी पाठ आहे. "एहसान तेरा होगा मुझपर", "तारीफ करू क्या उसकी", दिवाना हुआ बादल", "लाखों है निगाह में" हे आणि असे बरेच गाणे. इतकं भारी वाटलं ना! त्यानंतर किशोरला ऐकायची गोडी लागली आणि अभ्यास सोडून वारंवार ऐकलेली गाणीच डोक्यात बसायला लागली.
तीच गत "अंदाज अपना अपना" सिनेमाची. कॉलेजमध्ये असताना आम्ही मैत्रिणींनी अक्षरशः पारायणं केली होती ह्या सिनेमाची. तेव्हा एका मैत्रिणीकडे VCR होता. तिच्याकडे अभ्यासाला जाऊन आम्ही सिनेमा बघत बसायचो. आम्हा सगळ्यांना प्रत्येक डायलॉग पाठ आहे सिनेमाचा. आमिर आणि सलमान तेव्हा बरे दिसायचे एकंदर. पण सिनेमा भारी जमलाय हा. आता पुन्हा एकदा त्याच सगळ्या मैत्रिणींसोबत बघायचा आहे एकदा. आणि तीच मजा अनुभवायची आहे, बघु कधी योग येतो ते!
लिहीत होते इंग्लिश गाण्याविषयी आणि पोहोचले हिंदी सिनेमावर ह्यालाच म्हणतात " फिर भी दिल है हिंदुस्थानी"!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा