काहीकाही लोकांचं खरंच फार आश्चर्य वाटतं कधीकधी! अजब प्रकार असतात एकंदर.
आता माझी शेजारीण मॅगी काकुचेच बघा ना; त्या कुठून बाहेरून येत असतील आणि मी बाहेर निघाले असेल आणि आमची जिन्यात अथवा लिफ्ट मध्ये भेट झाली तर इतकं हसून आणि प्रेमानी बोलतील की बास. जसं काही जन्मल्यापासुन मी ह्यांच्याच शेजारी राहतेय! त्याच मॅगी काकु त्यांच्या घरातुन बाहेत पडायच्या तयारीत असतील आणि मी माझ्या घरातून बाहेर पडुन त्यांच्या घरात डोकावत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर चक्क तोंडावर दार लावतात. तू कोण अन मी कोण? असं कुठं असतय होय? इथे आपण आपल्या घराबाहेर शेजारी उभे असतील तर पटकन घरात बोलवतो. एक दिवस बळजबरी त्यांच्या घरात घुसावच म्हणतेय. कळेल तरी काय खजिना दडवून ठेवलाय ते.
मी रोज ज्या वेळेला स्टेशनला जाते त्याच वेळेला तिथे तिकीट मशीनच्या आसपास एक इसम फिरत असतो. चांगला तरणाताठा आहे. पण तरीही लोकांना तिकिटासाठी पैसे मागत फिरत असतो. बरेच लोक पैसे देतात; त्या लोकांना ओरडून सांगावंसं वाटतं "अहो नका देऊ पैसे, बिअर पितंय ते येडं तुमच्या पैशात". कारण मी लेकाला घेऊन येताना पाहते तर स्टेशनवरच्याच दुकानात बिअर घेत असतो. त्याच स्टेशनवर एक आजोबा हातात पुस्तक उंचावून सलग उभे असतात कारण त्याचं पुस्तक विकलं जावं म्हणून. मी जातानाही ते उभेच असतात आणि येतानाही. किती हा विरोधाभास.
दुसऱ्या एका स्टेशनवर एक आज्जी, आज्जीच बरंका; एकदम सुकड्या, हवा आली तरी पडतील अश्या आणि अविर्भाव एखाद्या बॉडीबिल्डरचा. एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बिअरची बाटली घेऊन अक्षरशः झुलत असतात रोज. एवढ्या झुलतात तर गपगुमान लिफ्टने यावं ना स्टेशनवर; पण नाही त्या पायऱ्यांनींच येतात. दोन पायऱ्या चढतात एक उतरतात पुन्हा दोन चढतात एक उतरतात; वाटतं पडतेय आता ही बाई दाणकन पण नाही त्या असं करत वर पोहोचतात. बरं कोणी मदत करायला गेलं तर त्या माणसाला शिव्यांची लाखोली अगदी ठरलेली. मी खाल्या आहेत एकदा शिव्या. जर्मन भाषेतील बऱ्याच शिव्या कळायला त्यांच्यामुळे फार मदत झाली मला. सिगरेट पितच ट्रेनमध्ये चढतात आणि मग इतर प्रवाश्यांवर आरडाओरड करतात. मग ट्रेनचालक येऊन त्यांना समज देतो तेव्हा कुठे सिगरेट बाहेर फेकतात आणि मग एकदाची ट्रेन निघते.
जवळच्या सुपरमार्केटमध्ये एक आजोबा अधूनमधून दिसतात. "ह्या ह्या ह्या ह्या" हसत असतात; तेही जोरजोरात. बिलींच्या रांगेत त्यांच्या पुढे मागे असणाऱ्या लोकांचे सामान स्वतःचं म्हणून घेऊन टाकतात आणि पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". आपण पुन्हा लेकाला पिटाळायचं सामान आणायला. आज आम्हाला विचारलं "तुम्ही इंडियन आहेत का? फारच छान देश आहे. मी इंग्लडला असताना गेलो होतो." पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". भारताला गरीब न म्हणता चांगला म्हणणारा परदेशी माणुस; हा तर चमत्कारच म्हणायचा! मग लक्षात आलं की आजोबांच्या डोक्यावर परिणाम झालाय.
मुलाला मस्त सरप्राईज देऊ वगैरे विचार डोक्यात ठेवुन, आई खूप दिवसांनी उत्साहाने शाळेत जाते त्याला घायला. आईला पाहुन "काय यार आई; तु कशाला आलीस मला घ्यायला? मी येतोय ना माझा माझा" असं म्हणणारा लेक! फार म्हणजे फारच गंमत वाटते बुआ.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

४ टिप्पण्या:
मस्त लिहिलंय👌👌
छान लिहीलेस. थोडी घाई झाली बहुतेक ��
धन्यवाद वृषाली!
घाई केल्यासारखं वाटतं आहे का?
टिप्पणी पोस्ट करा