गण्या धाव रे मला पाव दे ... चुकतंय,
गण्या धाव रे मला पाव रे... हं जमलं!
असं म्हणत म्हणत केलेले पाव मला पावले एकदाचे! कारण आतापर्यंत “केकने केली सुटका पावने छळले होते” व्हायचं माझं. दरवेळी घरच्यांवर मी केलेले पाव लादावे लागायचे पण ह्यावेळी चक्क लादीपाव मी त्यांच्यावर न लादता, “जमलेत" असं त्यांनी म्हणल्यावर मला स्वर्ग दोन पाव उरलाय.
नवरा तर ओठांपर्यंत आलेले शब्द “ये जो आपके पाव है ना, उन्हें हमें मत दिया किजीये” न बोलता गपगुमान लादलेले पाव खात होता. कारण आपलीच बायको आणि तिने केलेलेच पाव. आणि चुकून बोललाच तर बायको अजुन पाव लादायला मागेपुढे बघणार नाही ह्याची त्याला पक्की खात्री होती.
पण ह्यावेळी जमले बुआ एकदाचे! त्यामुळे मला आता त्या जुन्या सिनेमातल्या नायिकेसारखं संगीत ऐकु येतंय मनात आणि म्हणावंसं वाटतंय “आजकल पाव जम रहे मेरे!”
#पाव_पाव_की_बात_है
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा