जर्मनीत #कोरोना विषाणूच्या केसेस १४००-१५०० झाल्या असताना, सगळे मीडियावाले लोकांमध्ये जास्त मिसळू नका, असं करू नका, तसं करा वगैरे वगैरे कोकलत असताना, व्हाट्सऍपवर या विषाणूबाबतीत येणारे ज्ञानकण वेचताना नेमकं महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायची वेळ तुमच्यावर येते.
तर, अंडरग्राउंड मेट्रोमध्ये सकाळच्या वेळी बऱ्यापैकी गर्दी असते. मला महत्वाच्या कामासाठी बाहेर पडावंच लागलं आज. सगळी कामं आटपून घरी येण्यासाठी स्टेशनवर आले तर आजूबाजूच्या बऱ्याच लोकांनी मास्क घातलेले. मी मास्क न घातल्यामुळे सगळे माझ्याचकडे बघत आहेत की काय? असं उगीचच वाटलं. कधी एकदा मेट्रो येतेय असं झालं. आली एकदाची मेट्रो आणि मी आत गेले.
मेट्रोतल्या छोट्या टीव्हीवर #कोरोना विषयी जनजागरणाचा व्हिडियो नुकताच सुरु झाला होता. त्यात सांगत होते की हात नाकाला लावू नका आणि मला नाकाला खाज आली, मी नाक खाजवलं. दोन तीन टाळक्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. व्हिडीयोत सांगितलं डोळ्यांना हात लावू नका आणि माझ्या डोळ्याला खाज आली, मी डोळे चोळले. आता सात आठ टाळक्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं.
मनात फिल्मी विचार "ये हो क्या रहा है यार? अगर ये ऐसाही चलता रहा तो मेरा क्या होगा भगवान? ये जर्मन दुनिया मुझे जिने नही देगी."
व्हिडियोमध्ये सांगत होते कि शिंका आली तर असं शिंका, तसं शिंका आणि मला सट्टक्कन शिंका आली. आता पूर्ण डब्यातल्या टाळक्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर खाऊ की गिळू भाव. जसकाही तो विषाणू मीच घेऊन फिरतीये. तरी मी अगदी जर्मन पद्धतीने शिंकले बरं! पण डब्यातल्या लोकांच्या रोखलेल्या नजरा जश्याच्या तश्याच. वाटलं हे लोक मला पुढच्या स्टेशनला बाहेर ढकलतील. तरी बरं अंडरग्राउंड मेट्रो आहे नाहीतर मधेच दिलं असतं ढकलून.
"नहीं.. ये मेरे साथ नहीं हो सकता. मैने किसीका क्या बिगाडा है भगवान जो मुझे ये दिन दिखा रहे हो?"
जेव्हा मला दुसरी शिंका आली तेव्हा मात्र माझी खात्रीच झाली की नक्कीच डब्यातल्या कोणीतरी पोलिसांना बोलवलं असेल आणि पुढच्या स्टेशनवर "पुलिस मेरा इंतजार कर रही होगी". च्या## त्या विषाणूच्या तर. ५-७ मिनिटांचा प्रवास ५०० मिनिटांचा वाटायला लागला. कधी एकदा माझं स्टेशन येतं आणि मी ह्या लोकांच्या तावडीतून सुटते असं झालं.
आणि अचानक मला उपाय सुचला.. आजच व्हाट्सऍप वर आलेला #गो_करुणा चा व्हिडियो ह्या लोकांना दाखवूया आणि सांगूया मी हा उपाय केलाय हो. मला अजिबात कोणताच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पण सगळ्या लोकांना एकत्र करा आणि ह्या व्हिडीयोमध्ये म्हणत आहेत तस म्हणा. बघा कसा विषाणू धुम ठोकून पळून जाईल ते. पण माझ्या शिंकेमुळे सगळे माझ्याकडे मीच #कोरोना असल्यासारखं बघत होते. त्यामुळे व्हिडियो दाखवायाचं रद्द केलं.
मनात देवाचा धावा करत होते की एकतर लवकर स्टेशन तरी येऊदे नाहीतर "उठालेरे बाबा... मेरेकु नहीं रे.. ईस कोरोनाको!" दुसरीकडे #गो_करुणा चा मंत्रजप चालू होता बरं. शेवटी पाचशेव्या मिनिटाला आलं एकदाचं माझं स्टेशन आणि डब्यातल्या टाळक्यांनी आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_जर्मनी_डायरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा