शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

गाणं

एखादया दिवशी नाही का सारखं सारखं एकच एक गाणं डोक्यात राहतं पण त्याचे बोल आठवत नाहीत किंवा कोणत्या सिनेमा मधलं आहे ते आठवत नाही. अगदी तसंच आज सकाळपासून एक गाणं सारखं मनात येत होतं. कुठे ऐकलं तेही आठवत नव्हतं. पण राहुन राहुन मनात तेच तीन शब्द पिंगा घालत होते. बरं पुढचे बोलही आठवत नव्हते कि त्या गाण्याचा सिनेमा.

सकाळी स्वयंपाक करायला लागल्यापासून ते आत्ता थोड्यावेळापुर्वी चारचा चहा करण्यापर्यंत फक्त तीन शब्द, तेही तालासुरात. विचार करून डोकं बधिर झालं आणि मी त्या गाण्याचा शोध लावायला अधीर झाले पण ते गाणं काही दाद देत नव्हतं. त्या तीन शब्दांनंतरची एखादी ओळ तर आठवावी; पण शपथ. जीव खाल्ला त्या गाण्याने.

मी चार वाजायच्या थोडं आधी चहा टाकला आणि सासूबाईंसोबत टीव्ही पाहत बसले तर अचानक "युरेका" झाला ना! बरोब्बर ४ वाजता टीव्हीवर ते तीन शब्द असलेलं गाणं सुरु झालं एकदाचं! और फिर मुझे समज में आया की अर्रर्रर्र हि तर मराठी मालिका आणि त्याच मालिकेच्या शीर्षक गीतातले तीन शब्द माझ्या डोक्यात (गेलेले) होते सकाळपासून. भारतीय वेळेनुसार इथे सगळ्या मराठी मालिका दिसतात.

ओळखलं का तुम्ही?
.
.
नाही?
.
.
सांगूनच टाकते आता
.
.
"तुझ्यात जीव रंगला!"

आता पुढचं गाणं मला पुर्ण पाठच होईल बहुतेक थोड्या दिवसात!


#मराठी_मालिका


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

नमस्कार राजश्री ताई,

छान लिहिता तुम्ही. तुमचा ब्लॉग वाचला. ( rajashriswriteups.blogspot.com)

तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते.

मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू.

धन्यवाद ,

डॉक्टर स्पर्शिका जोशी.

स्त्री रोग तज्ज्ञ

M.D. D.G.O.

मुंबई

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक म्हणाले...

नमस्कार स्पर्शिका ताई,

तुमच्या छानश्या कमेंट बद्दल मनःपुर्वक धन्यवाद!

तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला कामाच्या व्यस्ततेमुळे जरा उशीरच झाला त्याबद्दल क्षमस्व.

मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल.

धन्यवाद.


राजश्री

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही