परवा "उरी" सिनेमा बघितला. हे म्हणजे खरंतर वरातीमागून घोडंच आहे पण तरीही फ़ेसबुकवर सांगावं लागतं ना! नाही नाही घाबरू नका अजिबात. परीक्षण वगैरे लिहीत नाहीये. आधीच सांगून टाकलेलं बरं नाहीतर पुढे वाचणारच नाही कोणी. असो.
तर सिनेमा हॉल एखाद्या चाळीतल्या खोलीत असल्यासारखा छोटासा. जो सुरू होतेही खतम हो गया. ४०-४५ लोक बसतील एवढाच हॉल. ते पाहून चिरंजीव म्हणाले नक्की इथेच आहे ना सिनेमा? तुम्ही पत्ता पहिला होता ना नीट? ते ऐकून आम्हालाही शंका आली पण हळुहळू भारतीय लोक आजूबाजूला जमा व्हायला लागले तेव्हा जरा बरं वाटलं. कारण एकतर रविवारी पहाटे दहा वाजता भर बर्फात आम्ही सिनेमा हॉल शोधत हिंडलो आणि तो जर चुकीचा असेल तर उरीची फ्यूरी व्हायला वेळच लागला नसता. बरेच लोक भारतीय वेळेनुसार आल्यामुळे पहिले १५ मिनिटे समोरच्या स्क्रिनवर विकी कौशलपेक्षा येणाऱ्या लोकांचे डोके बघुन फ्यूरी आलीच शेवटी. पण सहिष्णुतेचे बाळकडूच आपल्याला मिळालेले असल्यामुळे डोके(लोकांचे स्क्रिनवर दिसणारे) कितीही डोक्यात गेले तरी आपण डोकं शांतच ठेवायचं. पण चिरंजीवाचा उरीसाठीचा जोश बघुन फ्युरी आपोआप कमी झाली.
भारतीय लोकांच्या ह्याच सहिष्णूपणाचा एक भारी किस्सा मागच्या आठवड्यात दुसऱ्या एका सिनेमा हॉल मध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या साक्षीने घडला. एकतर तद्दन फिल्मी हिंदी सिनेमा त्यात तो बघायला २५-३० युरो खर्च करून लोक का जात असतील बरं? हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न कि ज्या हिरोचं नाव संग्राम भालेराव आहे त्या सिनेमाला "सिम्बा" हे नाव का दिलं असेल? नाही म्हणजे काहीतरी ताळमेळ असावा ना. असो बापडे आपल्याला काय करायचंय. मोदी आहेत ना प्रश्न सोडवायला. आणि हो आम्ही पण उरी बघितलंच ना! उगी कशाला घेणं ना देणं अन फुकटचं कंदिल लावणं!
तर सिम्बा नामक सिनेमाला जर्मन लोकांनी पण हजेरी लावली म्हणे. बिचारे! जगात आत्मविश्वास, अतिआत्मविश्वास असेलेले असंख्य लोक पहिले. पण सिनेमाला आलेल्या एका जर्मन मुलाने भारतीय लोकांच्या सहिष्णूपणावर ठेवलेल्या विश्वासाने भारावून गेले हो मी. त्या मुलाच्या विश्वासासमोर आत्मविश्वास,अतिआत्मविश्वास म्हणजे किस झाड कि पत्ती.
ह्या दादाने एका रो मधले दोन्ही टोकाचे एक एक तिकीट काढले. बरं असे दोन टोकाचे तिकीट काढले तर मित्राबरोबर तरी काढावेत ना जर काही वाईट प्रसंग ओढवला तर मित्र बिचारे मदतीला हजर असतात. पण दादाने गर्लफ्रेंडसोबत असे तिकीट काढले. भारतीय लोकांचा सहिष्णूपणाच कारणीभूत ह्याला अन दुसरं काय? त्याला वाटलं विनंती केली की सरकतील सगळे बाजूच्या सीट्सवर आणि आपल्या भारतीय लोकांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला बरं. सगळेजण एका टोकाला सरकले आणि घात झाला ना दादाचा. भारतीय लोक सरकले पण दोन जर्मन तरुणीसुद्धा त्याच रोमध्ये होत्या त्यानी साफ नकार दिला! ह्याबाबतीत म्हणजे फटकळपणा करण्यात जर्मन लोकांचा पुणेकरही हात धरू शकत नाहीत बरं!
दादा त्यांना बापुडवाणा चेहरा करून समजवतोय पण त्या ऐकतील तर शपथ. एक क्षण तर असा आला आता वाटलं रडतंय लेकाचं. तो तरी काय करणार प्रसंगच तसा ओढवला त्याच्यावर. गर्लफ्रेंड बसलेली एका टोकाच्या सीटवर आणि हा हातापाया पडतोय दुसऱ्याच पोरींच्या. त्या जर्मन प्रेमी युगुलाची झालेली ताटातूट पाहून भारतीय सहिष्णू लोक हळहळले बिचारे. त्यांनी फार प्रयत्न केला त्यांना एकत्र आणायचा पण "उसके अपने खूननेही उससे बेईमानी की आखिर". गर्लफ्रेंडने त्याला दिलेले लुक्स तर जन्मात नाही विसरायचा तो. शेवटी स्वतःला सावरुन जी जागा मिळाली तिथे बसला बिचारा. मध्यंतरात त्याची गर्लफ्रेंड जे बाहेर पडली आणि हा तिच्या मागोमाग ते पुन्हा दिसलेच नाही! .
त्या दादाची गर्लफ्रेंड अजून आहे का सोडून गेली देव जाणे?

1 टिप्पणी:
आयला भारीच की. बिच्चारा गर्लफ्रेंड होती कि बायको देव जाणे
टिप्पणी पोस्ट करा