आजकाल लोक कोणता प्राणी पाळतील सांगताच येत नाही. म्हणजे साधारण महात्वाचे मला माहीत असलेले म्हणजे कुत्रा, मांजर, मासे आणि जास्तीत जास्त हॅमस्टर. माझ्या बुद्धीची कुवत इतक्या प्राण्यांच्या पलीकडे नाहीये.
पण आत्ता फिरायला बाहेर पडले तर एक जोडपं चक्क दोन मुंगूससदृश्य प्राण्यांच्या गळ्याला दोर बांधून फिरवत होते. ते जोडपं रस्त्याच्या पलीकडे होतं. ते दोन इवले जीव बघून माझं कुतूहल अतीच जागं झालं. मग काय विचारता मी लगे झपाझप पावलं टाकत त्यांना गाठायचा प्रयत्न केला. कशीबशी त्यांच्या जवळ पोहोचले तर ते घाबरले ना!
मुंगूस नाही काही.. माणसं घाबरले. आजकाल माणसंच माणसांना जास्त घाबरत आहेत. त्यात आपण पडलो फॉरेनर त्यामुळे तर विचारायलाच नको! घाबरून ते जोडपंही झपाझप पावलं टाकायला लागलं. तरी मी मास्क घातलेला नव्हता. तो असता तर ते जोडपं मुंगूसाना कडेवर घेऊन पळतच सुटलं असतं कदाचित.
मनात म्हटलं “तुम लोग कितनी भी कोशीश करो भागानेकी लेकीन मैं मुंगूसको देखके राहुंगी!” आता मी पण चालण्याचा वेग वाढवला, म्हटलं जरा साहस करूनच बघूया, फार कंटाळा आलाय घरात बसुबसू! मला फास्ट येतांना बघून खरोखर पळाले ना ते मुंगसाला कडेवर घेऊन! पोलिसांना फोन केला नसावा म्हणजे मिळवलं! 🙄
असो. आज के लिये बस ईतनाही!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_म्यूनिक_डायरी